कुऱ्हाडीचा धाक दाखवीत रोकड लांबविली !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दोन दुकानदारांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यामधून २ हजार ३०० रुपये चोरून नेले. ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी २२ रोजी शहर पोलिस ठाण्यात अजीज खान उर्फ बाबा (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, रेल्वेस्थानकाजवळ सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर (३०, रा. शिवाजीनगर) यांचे रेल्वे स्थानकाजवळ चहा विक्रीचे दुकान आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री त्या ठिकाणी अजीज खान हा चारचाकी वाहन (एमएच १९ बीजे १२२१) घेऊन आला. त्याने कुन्हाडीचा धाक दाखवत सैय्यद ऐहसान यांना धमकावत गल्ल्यातून १ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर बाजूला असलेल्या दुकानात राहुल सुनील खर्चाने यांनाही कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यातील ८०० रुपये काढून घेतले.
याप्रकरणी सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अजीज खानविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल भवारी करीत आहेत.