Wednesday, January 22, 2025
Homeक्राईमकुसुंब्याचा तलाठी तीन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ सापडला !

कुसुंब्याचा तलाठी तीन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ सापडला !

कुसुंब्याचा तलाठी तीन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ सापडला !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव, तसेच स्लॅब रजिस्ट्ररवर नाव लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कुसुंबा येथील तलाठ्याला जळगाव लाच लुचपत विभागाने कारवाई करत रंगेहात पकडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या घटनेने पुन्हा महसुल विभागाची लाचखोरी चव्हाटया वर आली आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,नितीन शेषराव भोई वय-३१, रा. जळगाव असे अटक केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून त्यांनी कुसुंबा येथील तलाठी यांच्या कार्यालयात सातबारा उताऱ्यावर आई व भावाचे नाव लावण्यासाठी तसेच स्लॅब रजिस्टरवर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता.दरम्यान सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठी नितीन भोई यांनी तक्रार यांच्याकडे प्रथम ५ हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान रक्कम कमी करून तडजोड अंती अखेर ३ हजार रूपये देण्याचे ठरले.या अनुषंगाने तक्रारदार यांनी जळगाव येथील लाच लुचपत विभागाला तक्रार केली होती त्यानुसार पडताळणीसाठी पथकाने मंगळवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ३ हजार रुपयांची लाच घेतांना तलाठी नितीन भोई याला रंगेहात पकडले आहे.
दरम्यान, या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे . वर्ष सुरू झाल्यावर महसुल विभागाने लाचखोरी चा पहीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या