कोंबिंग ऑपरेशनदरम्यान अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर मोठी कारवाई ; १०१ जणांवर पोलिसांची कारवाई!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्हाभरातील सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा पोलिस दलाकडून सोमवारी सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० वाजेदरम्यान कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अनेक अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. दारूबंदी, जुगार, गांजा सेवन करणाऱ्या १०१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोंबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी दारूबंदीच्या ५६ केसेस दाखल केल्या, तर सट्टा जुगाराच्या २९ प्रकरणांचा पर्दाफाश केला. यासोबतच, अंमली पदार्थ विरोधी कारवाईत (एनडीपीएस) १६ जणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) बजावणीत पोलिसांनी मोठी यश मिळवले असून ४१ वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे.
कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांकडून जिल्हाभरात नाकाबंदी देखील लावली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १ हजार ५१७ वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारची मोहीम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.