गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूचे वाहन महसूलने केले जप्त !
भडगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांत सात वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पाचोरा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली २५ रोजी मध्यरात्री वाळूचे ३ डंपर व १ ट्रॅक्टर जप्त करून तहसील – कार्यालयात जमा केले आहेत. तसेच २९ रोजी टोणगाव येथील घोडदे परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडले. ३० रोजी रात्री १:३० वाजता पिंपळगाव बुद्रुक गिरणा नदीच्या पात्रातून वाळू वाहून नेत असलेले १ डंपर पकडून तहसील कार्यालयात जमा केले आहे.