ग्रामविकास मंत्री यांच्याकडे श्री गणेशाची आरती करून रावेर विधान मतदार संघातील समस्या डॉ.कुंदन फेगडे यांनी मांडल्या!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या मुंबई येथील सेवासदन या निवासस्थानी भक्तिमय वातावरणात त्यांच्या कुटुंबीयांसोबत श्री गणरायाची आरती करण्याचे भाग्य यावल येथील डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांना लाभले.यावेळी विघ्नहर्ता गणपती बाप्पा समोर रावेर विधानसभा मतदार संघातील समस्यांचा पाढा सुद्धा डॉक्टर फेगडे यांनी वाचला.
रावेर विधानसभा मतदारसंघात शेती अंतर्गत रस्ते न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही आवश्यक रस्ते सुद्धा न झाल्याने मतदार संघात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल शहरात गणेशोत्सव साजरा करताना आगमनाच्या वेळी आणि विसर्जनाच्या वेळी जी मिरवणूक काढली जाते त्या संदर्भात सुद्धा डॉ.फेगडे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याशी चर्चा केली.गेल्या दोन दिवसांपूर्वी बुरूज चौकात हायमस्ट खांबावर झेंडा फडकल्याचे दृश्य सुद्धा मंत्रालयात पोहचल्याने याबाबतची कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून सुरू झाली आहे यावल नगरपरिषद किंवा यावल पोलिसांनी यावल शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तथा जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था,शांतता अबाधित राहण्यासाठी आणि बुरुज चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत किंवा नाही..? त्यात झेंडा लावणारा दिसून येत आहे किंवा नाही..? किंवा झेंडा लावणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून गुन्हा दाखल होणार आहे किंवा नाही..? भविष्यात अशा प्रकारे कोणी कोणताही झेंडा फडकू नये म्हणून काय दक्षता घेतली जाणार याबाबत सुद्धा वरिष्ठ स्तरावरून कारवाई सुरू झाल्याचे समजले.