घराच्या हिस्स्यावरून वाद अन चाकूने झाला वार !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घराचा हिस्सा देण्यावरून वाद होऊन चार जणांनी आरूस्तुलबी मासूम पिंजारी (८०, रा. कोळगाव, ता. भडगाव) यांच्यासह दोघांना मारहाण केली तसेच चाकूनेही दुखापत केली. ही घटना १ डिसेंबरला टागोरनगरात घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंजारी कुटुंबीयांचे जळगावात टागोरनगरमध्ये घर आहे. या घराचा हिस्सा देण्यावरून वाद झाला. तो वाढत जाऊन आरुस्तुलबी पिंजारी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच इतर दोन जणांना चाकूने दुखापत करण्यात आली. याप्रकरणी आरुस्तुलबी पिंजारी यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना राठोड करत आहे