चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीकडून दोन दुचाकी हस्तगत !
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उमर फारुख कलीम अहमद (२०, गाँसे आझम नगर मालेगाव, जि. नाशिक) व मोहम्मद शोएब मोहम्मद इलियास (२३, गौसे आझम नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मुबशीर खान मेहमूद खान यांचे किराणा दुकान असून ते घाटरोड, छाजेड ऑईल मिल परिसर चाळीसगाव येथे राहतात. त्यांच्या मालकीची दुचाकी १३ रोजी रात्री ११ ते दि. १४ रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोरुन चोरट्याने चोरून नेल्या. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक स्थापन केले. अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मिळालेल्या फुटेजच्या आधारे आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.