Monday, April 7, 2025
Homeजळगावजंगलात लागली भरदुपारी अचानक आग : दोन ते तीन शेतांचे नुकसान....तब्बल चार...

जंगलात लागली भरदुपारी अचानक आग : दोन ते तीन शेतांचे नुकसान….तब्बल चार तासांनी आग आटोक्यात !

जंगलात लागली भरदुपारी अचानक आग : दोन ते तीन शेतांचे नुकसान….तब्बल चार तासांनी आग आटोक्यात !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील जुनोने येथील वनक्षेत्रात अचानक आग लागून २२ हेक्टर जंगल आणि दोन तीन शेतांचे नुकसान झाले आहे. तब्बल चार तासांनंतर अग्निशमन दल, गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने साडे चार तासांनी आग आटोक्यात आली. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

अमळनेर तालुक्यात चार दिवसांत तीन मोठ्या आगी लागून नुकसान झाले. गेल्या आठवड्यात अंबर्षी टेकडी पाठोपाठ सात्री गावात आग लागली होती. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुनोने वनक्षेत्राला आग लागली. भरदुपारी आग लागली त्यात वारा सुरू असल्याने जंगलात जणू वणवाच पेटला. उन्हाच्या चटक्यांमुळे आग आटोक्यात आणण्याचे धाडस होत नव्हते. वनविभागाने आगीची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवली. त्यांनी तातडीने दोन अग्निशमन बंब पाठवले. मात्र जंगलात अग्निशमन बंब जाऊ शकत नसल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण आली. आगीच्या झळा आणि वरून ऊन यामुळे अग्निशमन दल, वन कर्मचारी, गावकरी यांची लाहीलाही होत होती. संयुक्त वन समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी लागलीच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. अथक प्रयत्नांनंतर चार तासांनी म्हणजेच सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

अग्निशमन दलप्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिन्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आकाश संदानशिव, आकाश बाविस्कर या कर्मचाऱ्यांसोबत वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक सुप्रिया देवरे, वनमजूर अधिकार पारधी, प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील हे वन कर्मचारी दगाजी पाटील यांचे टँकर आणि पोलिस पाटील उमेश महाले, पोलिस पाटील नरेंद्र पवार, युनूस पठाण, अमजद पठाण यांनी पाइप जोडून पाणी मारत होते. काहीजण मातीच्या सहाय्याने तर काही झाडांचा पाला घेऊन गवतावर मारून नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत होते

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या