जनजागृतीसाठी यावल पश्चिम विभागातर्फे हरीपुरा येथील आश्रम शाळेत वन्यजीव सप्ताह.
यावल दि.२ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल तालुक्यातील हरिपूरा येथे मंगळवार दि. ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी अनुदानित आश्रम शाळेत वन्यजीव सप्ताह १ ते ७ ॲाक्टोबर च्या निमित्ताने “मानव-वन्यजीव संघर्ष निवारण” तसेच “वने व वन्यजीव” या बाबत यावल पश्चिम वन क्षेत्र विभाग व वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जन जागृती सभा घेण्यात आली.
यावेळेस वाईल्ड ल्यॅंड्स कंझर्वेशन फाऊंडेशनचे संस्थापक अजिंक्य भांबुरकर यांनी वन्यजीव सप्ताह कधी सुरू करण्यात आला व त्याचे उद्देश काय तसेच मानव-
वन्यजीव संघर्ष म्हणजे काय..? गाव व जंगल ची भौगोलिक स्थिती कशी आहे,जंगल कसे कमी होत चालले आहे,आपण जंगलावर कसे निरभर आहोत,वाघ-बिबटच्या हालचाली व सवई काय आहेत, कुठल्या स्थिती मध्ये वाघ-बिबट मानवावर हल्ला करतो व मानव-वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठीचे उपाय सांगण्यात आले. १) नाले, पाणवठे, ठंडावाच्या ठिकाणी जाण्यास टाळावे २) ज्या ठिकाणी वाघ-बिबटचे ठसे आढळ ले त्या ठिकाणी जाण्यास टाळावे ३) अचानक पणे वाघ-बिबट समोर आल्यास त्या कडे पाठ न करता ४) हळूहळू मागे सरकून सुरक्षित अंतर ठेवावे ५) वाघ-बिबट शेतात गाव परिसरात आढळून आल्यास त्याचा पाठलाग करू नका व घेरू नका आज जर मानव-वन्यजीव संघर्ष टाळायचा असेल तर विद्यार्थी,शिक्षक व स्थानिक लोकांचा सहभाग अत्यावश्यक आहे व सहजीवन अवलंबले तर हा संघर्ष सहज टाळता येईल.तसेंच यावल पश्चिम वनपरिक्षेत्र भिकारी सुनिल ताराचंद भिलावे यांनी आन्नसाखळीतील वरचा घटक वाघ हा आपल्या सातपुडा जंगलात असून लोकांना त्याला पाहता यावा, जंगलात भ्रमंती करता यावी म्हणून पाल याठिकाणी जंगल सफारी सुरु करण्यात आली असून जंगल शाबूत राहिले तर आपल्याला वाघ पाहण्यासाठी कुठेही जावं लागणार नसल्याचे सांगितले वरील जनजागृतीचा कार्यक्रम आदरणीय जमिर शेख साहेब (भा.व.से ) ( उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगाव ), समाधान पाटील साहेब ( मा.व.से ) ( सहाय्यक वनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगाव) यांचे मार्गदर्शनाखाली सुनिल भिलावे वनपरीक्षेत्र अधिकारी यावल प. वनपाल संजय इंदे,दिपक परदेशी, वनरक्षक सुधीर पटणे,अश्रफ तडवी,रविकांत नगराडे,अक्षय रोकडे, विलास तडवी, दिपक चव्हाण,योगेश मुंडे,योगेश सोनवणे यांनी कार्यक्रम पारपाडला.