जळगावात १९ वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्या !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – घरात कुटुंबातील सदस्य असताना बेडरूममध्ये जाऊन विशाखा गौतम सोनवणे (१९, रा. संभाजीनगर) या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३ रोजी संध्याकाळी घडली. मू, जे. महाविद्यालयात शिक्षण घेत होती.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, वडिलांचा वाढदिवस असल्याने विशाखाने दुपारी तसे स्टेटस ठेवले होते.विशाखा हिचे वडील गौतम सोनवणे यांचा ३ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. तिने संध्याकाळी टोकाचा निर्णय घेत स्वतःचे जीवन संपविले. यामुळे सोनवणे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ३ फेब्रुवारी रोजी घरात सर्व सदस्य असताना विशाखा बेडरूममध्ये गेली व गळफास घेतला. काही वेळाने तिची आई तिला बोलवण्यासाठी गेली असता त्यांना मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी तरुणीला मयत घोषित केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.