जळगाव येथील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव येथे महामार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात होत आहेत. गेल्या ३ दिवसापूर्वी तरुणीसह महिलेला भरधाव ट्रकने चिरडले ही घटना ताजी असताना आज शनिवार दि. ३१ऑगस्ट २०२४ रोजी पुन्हा यावल येथील मुळचे रहिवासी आणि जळगाव येथील रहिवाशी ७८ वर्षीय वृद्धाचा अपघात झाला भरधाव कारने वृद्धाला जबर धडक दिली.यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.अजबसिंग नारायण पाटील ( वय ७८, रा. द्वारकानगर,जळगाव,मूळ रहिवासी ता.यावल) असे मयत वृद्धाचे नाव असून या घटनेनंतर आहुजानगर जवळ परिसरातील. संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केला. प्रसंगी पोलिसांनी वेळीच दखल घेऊन दंगा नियंत्रण पथकाच्या माध्यमातून संतप्त परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, अजबसिंग पाटील हे द्वारका नगर येथे राहणाऱ्या मुलीकडे राहत होते. तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या परिवारासह यावल तालुक्यात शेतीकाम करण्यासाठी राहतो.आज सकाळी १० वाजेनंतर ते द्वारकानगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर नेहमीप्रमाणे गेले असता. रस्ता ओलांडत असताना जळगाव करून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली.त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, तीन दिवसापूर्वी महामार्गावरील मानराज पार्क जवळ एका १७ वर्षीय मुलगी आणि ३२ वर्षीय महिलेला ट्रकने चिडल्याची दुर्दैवी घटना घडली होती.आज पुन्हा झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. परिसरातील नागरिकांनी तीव्र संतापात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.