जळगाव विभागातील आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालय तृतीय!
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभागातील आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा नुकत्याच के. सी. ई. आय. एम. आर. महाविद्यालयाने आयोजित केल्या त्या स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर पुरुष व महिला दोन्ही संघांनी स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वी कामगीरी केली.
धनाजी नाना महाविद्यालयाच्या पुरुष संघाने तृतीय क्रमांक पटकावला व महिला संघाने दैदीप्यमान कामगिरी करत जळगाव विभागाच्या संघात पाच पैकी तिन खेळाडूंची निवड झाली. जळगाव विभागाच्या संघात निवड झालेले खेळाडू यापुढे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत आंतर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होतील.धनाजी नाना महाविद्यालय पुरुष संघात अनिकेत बढे, उमेर शेख, ओमकार रितापूरे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. महिला संघात जान्हवी जंगले, इंसिया बोहरी, रिया पाटील या महिला खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत विभागीय संघात स्थान निर्माण केले. पुरुष संघात प्रदिप पाचपोळे व सचिन भोई यांचा सहभाग होता. तर महिला संघात दीक्षा भालेराव व रोहिणी माळी या महिला खेळाडूचा सहभाग होता.
विजयी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. बी. वाघुळदे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग आणि मित्र सर्वांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सदरील खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोविंद सदाशिवराव मारतळे यांचे मार्गदर्शन लाभले. संघा सोबत संघ व्यवस्थापक म्हणून श्री राजेंद्र ठाकुर यांनी यशस्वी कामगीरी केली.