जागतिक दिव्यांग दिन : नगरपालिकेने केला दिव्यांगांचा सन्मान
फैजपूर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
–
३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने फैजपुर नगरपालिकेत शासकीय कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम दिव्यांग जनक हेलर केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी न.पा. प्रशाशक तथा उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे होते. अध्यक्षीय भाषणात दिव्यांग बांधवांचे शासकीय योजनांच्या बाबतीत संजय गांधी निराधार योजना, रेशनकार्ड तसेच कोणत्याही प्रकारच्या इतर काही समस्या असतील तर माझेकडे कळवा. संबंधित विभागाकडून तत्काळ सोडवुन घेण्यात येतील. नगर परिषदेचे कर निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी दिव्यांग जनक हेलन केलर व जागतिक पातळीवर दिव्यांग दिन व कायदा कशाप्रकारे अंमलात आला याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला फैजपुर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी भाग- फैजपुर बबनराव काकडे, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक माधव कुटे, लेखापाल निलेश दराडे, लेखापरीक्षक मंगलसिंग वतपाल, कर निरीक्षक हेमंत ठाकरे, प्रकल्प अधिकारी (दिव्यांग विभाग) प्रवीण सपकाळे, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक संगीता बाक्षे, समुदाय संघटक विद्या सरोदे तसेच फैजपूर दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन, नाना मोची (भाजपा दिव्यांग विकास आघाडी ता.अध्यक्ष), दि.से तालुका अध्यक्ष योगेश चौधरी, राहुल कोल्हे (जिल्हा सल्लागार), महीला संघटक सुषमा महाजन, ऊपाध्यक्ष ललित वाघुळदे, जितेंद्र मेढे ,चेतन तळेले ता.सचिव, सदस्य युनुस तडवी, गणेश भारंबे, संजय वानखेडे, विनोद बि-हाडे, अंकुर भारंबे, कुणाल वाघुळदे, शे.रईस, मो.वसिम, रोहीत तायडे व शहरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन माजी मुख्याध्यापक गणेश गुरव सर यांनी केले. शेवटी नपा. प्रशासनाचे फैजपूर दिव्यांग संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.