जे.टी.महाजन स्कूलने लहान मुलं,मुली विद्यार्थ्यांना पारंपरिक पोळा सणाचा धडा शिकविला.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल येथील जे.टी.महाजन स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूलने संयुक्तिकरित्या आपल्या स्कूलमधील लहान लहान, मुलं-मुली विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचा तथा बळीराजाचा प्रिय असलेला पारंपरिक बैल पोळा सणाचे महत्व आणि माहिती होण्यासाठी तसेच परंपरा जोपासण्यासाठी पोळा सण कसा कोणत्या उद्देशाने साजरा केला जातो.. याबाबतचा प्रात्यक्षिक धडा आज सोमवार दि.२ सप्टेंबर २०२४ सकाळी स्कूलमध्ये देऊन पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावल येथिल व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन स्कूल मध्ये बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या रंजना महाजन मॅडम होत्या तसेच इंग्लिश मिडियमचे प्राचार्य ज्ञानेश्वर मावळे सर,पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम,भिरूड मॅडम उपस्थिती होते.प्राचार्यः ज्ञानेश्वर मावळे सर यांनी बैल जोडीचे पुजन करून बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन शेतकरी तथा बळीराजा पोळा सण का व कशासाठी साजरा करतात..? तसेच पोळा सणाचे महत्व सांगून पोळा सण परंपरा आपण कशा पद्धतीने सुरू ठेवली आहे याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमात प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.व बैलपोळा बद्द्ल माहिती सांगितली सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रद्धा बडगुजर मॅडम यांनी केले.तर इतर पारंपरिक माहिती हितेश्री मॅडम यांनी दिली.आभार प्रदर्शन वंदना चोपडे मॅम यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेत नियोजन करून स्कूलमध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.