डिंगम्बर महाराज चिनावलकर मठाच्या भव्य सभागृहाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
फैजपूर : प्रतिनिधी. खानदेश लाईव्ह न्युज
श्री क्षेत्र पंढरपूर येथे वै. डिंगम्बर महाराज मठाचे प्रांगणात भव्य सभामंडप उभारला जाणार असून त्याचे भूमिपूजन प पु प्रभाकर दादा बोधले अधिपती संत माणकोजी महाराज बोधले यांचे शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नरेंद्र नारखेडे होते. सभामंडप साठी लागणारा
निधी ना. गिरीश भाऊ महाजन यांनी पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनाने एक कोटी मंजूर केल्याची माहिती अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली सदर काम सहा महिन्यात पूर्ण होईल. कार्यक्रमास उपाध्यक्ष घनश्याम पाटील, मानद सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले तसेच माजी नगराध्यक्ष निलेश राणे, विषवस्थ जयराम पाटील, त्रंबक चौधरी, अतुल तळेले, जनार्दन भारंबे, रमेश भंगाळे, मधुकर बोन्डे, झेंडूजी महाराज बेळीकर मठ अध्यक्ष रमाकांत भारंबे, पंढरीनाथ पाटील, विकास पाटील, हर्शल महाराज खिर्डीकर, प्रमोद बढे, गिरीश वारके, ठेकेदार तेजस निकम, मयूर नारखेडे, अक्षय परदेशी सह भाविक व कार्यकर्ते उपस्थित होते.