डेंग्यू, टायफॉईड सदृश्य आजाराने वरणगांवात रूग्णसंख्येत वाढ .
वरणगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
गेल्या दोन अडिच महिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता.आतापर्यंत मान्सूनच्या १२० दिवसांपैकी ९०/९५ दिवसात सरासरीपेक्षा वीस ते पंचवीस टक्के पाऊस झाला आहे .
एकीकडे ऑक्टोबर हिटची दाहकतायुक्त ३२ ते ३४ अंशा दरम्यान तापमान आणि हवेतील आर्द्रतेमुळे आणि ठिकठिकाणी पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने वरणगाव शहरात डेंग्यू , टायफाईड व व्हॉयरल इन्फेक्शन सारखे आजार बळावल्याने खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे .
तर दुसरीकडे मान्सूनमुळे प्रवाहीत झालेल्या नदी नाल्यांचे दूषित पाणी स्थानिक पाणीपुरवठा योजनांव्दारे तुरटी व अन्य घटकांव्दारे यंत्रजलशुद्धीकरण न होता थेट संमिश्र पाणीपुरवठा होत आहे.तसेच स्थानिक प्रशासनाकडून फिनाईन,डास निर्मूलनासाठी फॉगींग मशीनव्दारे धूर फवारणी होत नसल्याने त्यामुळे डेंग्यू, टायफॉईड तसेच सर्दी, पडसे,खोकला सारखे व्हायरल इन्फेक्शन आजार बळावले असून या आजारांचे निदान वेळेवर होत नसल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
वरणगांव येथील जालिंदर नगर व इतर भागात डेंग्यु चे रुग्ण आढळले असल्याचे समजते परंतु एम पी डब्लू मनोज माळी यांच्याशी संपर्क साधला असता खाजगी दवाखान्यात डेंग्यु पॉझीटिव्ह आलेल्या पेशंट चे रक्त नमुने तपासण्या धुळे येथे पाठविल असता त्या निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे .
तसेच ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टर स्वप्नील दसरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डेंग्यू तपासणीसाठी आमच्याकडे साहीत्य उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे .
शहरात मोकळे भूखंड, पडक्या इमारती, घरे आदी ठिकाणच्या परिसरात दुरूस्ती देखभाली अभावी झाडाझुडूपांचे साम्राज्य पसरले असून त्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसून येत आहे. या ठिकाणी स्थानिक नगरपरिषद, प्रशासनाने धूर फवारणी करावी. उघड्या नाले गटारांच्या परिसरात फिनाईलयुक्त डास किटकनाशक द्रवाची फवारणी करावी, जेणेकरून डासांची उत्पत्तीस अटकाव होवू शकेल.