भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ विधानसभे करीता काँग्रेस पक्षाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पहिल्या क्रमांकावर डॉक्टर राजेश तुकाराम मानवतकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. डॉक्टर राजेश मानवतकर हे काँग्रेस पक्षाकडून पंजा या निशाणी वर निवडणूक लढवणार आहे. डॉक्टर राजेश मानवतकर यांना उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
भुसावळ विधानसभेची जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे होती .मात्र ही जागा ऐनवेळी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याने काँग्रेस पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भुसावळ शहरातील स्वराज हाॅटेल मध्ये तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार निरीक्षक डॉक्टर जगदीश चौधरी उपस्थित होते. या बैठकीला डॉक्टर राजेश मानवतकर व प्रिती तोरण महाजन यांना बोलविण्यात आले होते. यावेळी इच्छुक उमेदवारांनी सुध्दा हजेरी लावली होती. या बैठकीत डाॅक्टर राजेश मानवतकर व प्रिती तोरण महाजन यांचे नाव आघाडी वर होते. याबाबत नवराष्ट्र प्रतिनिधीने डाॅक्टर राजेश मानवतकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार आहे. अजुन नामांकन दाखल करण्यास वेळ आहे.
सद्या मी वेट अँड वाॅचच्या भुमिकेत आहे. असे नवराष्ट्र प्रतिनिधीला सांगितले होते . शनिवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली. त्यात डॉक्टर राजेश मानवतकर यांना भुसावळ विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.भुसावळ विधानसभा मतदारसंघातून निळकंठ फालक हे काँग्रेस पक्षाकडुन निवडून आले होते. त्यानंतर मात्र काँग्रेस पक्षाला गड राखता आला नाही. आता मात्र भुसावळ विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघात यावेळी तिहेरी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
डॉक्टर राजेश मानवतकर यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य माणसाला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी ऋणी असून त्यांचे मी आभार व्यक्त करतो लवकरच सर्व महा विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही डॉक्टर मानवतकर यांनी सांगितले आहे.,
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र निकम ऑल इंडिया बहुजन विकास पार्टीचे अध्यक्ष मोहन निकम भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण सोळंके काँग्रेसचे प्राध्यापक संदाशिव सर ,जळगावचे माजी महानगर अध्यक्ष रमेश बाऱ्हे, काँग्रेसचे एडवोकेट प्रवीण सुरवाडे, आनंद चौथमल, उद्धव सेनेचे शहर संघटक योगेश बागुल, प्रवीण आखाडे, सिद्धार्थ पगारे, विजय मोरे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ाजू डोंगरदिवे काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष संतोष साळवे सुदर्शन इंगळे योगेश पांडव आधी पदाधिकारी उपस्थित होते.