डॉ. सपना जंगले यांना पीएचडी पदवी प्रदान
खांदेश लायुव्ह न्यूज. भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ, ता. २० : प्रभात आईस्क्रीम पार्लरचे संचालक कांती कमलाकर जंगले यांच्या पत्नी डॉ.सौ सपना जंगले यांनी जेजेटीयु राजस्थान विद्यापिठातील वाणिज्य शाखेचे पीएचडी पूर्ण करून पदवी डॉक्टरेट ही घेतली असुन त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
त्यांचे मार्गदर्शक डॉ. सौ. सपना जंगले यांना डॉ. श्रद्धा भोमे प्राचार्या, जे. के. कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स,मुंबई आणि सह-मार्गदर्शक डॉ.अरविंद चौधरी प्राचार्य, आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज, बोदवड यांचे मार्गदर्शन लाभले.भुसावळ आर्टस् सायन्स अँड पी. ओ नाहटा कॉमर्स कॉलेज, भुसावळ येथील सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळे त्यांना अभ्यासक्रमात विशेष मदत मिळाली.
त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल परिसरातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.