तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना अधीक्षिकेला रंगेहाथ अटक !
धुळे खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शिक्षक दांपत्याकडून २ लाखांची लाच स्वीकारणाऱ्या माध्यमिक शिक्षण विभागात वेतन अधीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या मीनाक्षी गिरी यांना लाच लाचलुचपत विभागाने (bribe case) २० ऑगस्ट मंगळवार रोजी अटक केली आहे या कारवाईमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तकारदार व त्यांची पत्नी हे धुळे येथील महानगरपालिका हायस्कूल येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीतील थकीत वेतन तसेच ७ व्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर होऊन शिक्षण संचालक यांनी थकीत वेतन धुळे येथील अधिक्षक (माध्यमिक), वेतन व भविष्य निर्वाह निधी यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु हे थकीत वेतन तकारदार व त्यांच्या पत्नीस अदा न झाल्याने त्यांनी वेळोवेळी अधीक्षिका श्रीमती मिनाक्षी गिरी यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली होती. परंतु त्यांनी वेगवेगळ्या कारणाने तक्रारदार व त्यांच्या पत्नीला त्यांचे थकीत वेतन अदा केले नाही. त्यामुळे दहा ते वीस दिवसांपूर्वी तक्रारदाराने थकीत वेतन अदा करण्याबाबत गिरी यांना विनंती केली, त्यावेळी मीनाक्षी गिरी यांनी तक्रारदाराकडे दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्याकडे (bribe case) तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत मीनाक्षी गिरी यांना तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच देतानाची रक्कम कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान,काल मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (bribe case) ही कारवाई केली आहे.यांच्याविरुद्ध धुळे शहर पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे