तहसील कार्यालयातील शिपाई कै.बाळू पाटील यांच्या कुटुंबीयांना ४० लाख अपघात विमा रक्कम वितरित!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – २० डिसेंबर २०२४ रोजी कै. बाळू पाटील यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक आणि टपालाचे काम संपवून घरी परतत असताना दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत, स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे त्यांच्या पगार खात्यावर मंजूर ₹ ४० लाख अपघात विमा रक्कम प्रदान करण्यात आली.
रक्कम प्रदान करताना भारतीय स्टेट बँकेचे जळगाव रिजनल मॅनेजर धर्मेंद्र सिंग फैजपूर प्रांताधिकारी बबन काकडे
तहसीलदार यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर, SBI यावल शाखा व्यवस्थापक राधेश्याम मुगमुळे स्टेट बँक ऑफ इंडिया कडून ही आर्थिक मदत मिळाल्याने कुटुंबाला थोडासा आधार मिळेल. जिल्हा प्रशासन कै.बाळू पाटील यांच्या कुटुंबीयांसोबत आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करते.