भुसावळ तालुका पोलिसांत अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – महिलेचा गैरफायदा घेऊन अनैतीक संबंध प्रस्थापित केले लग्नाचे खोटे आमिष दाखऊन वारंवार अत्याचार व फसवणुक करून लग्नास नकार देत जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी एका महिलेने भुसावळ तालुका पोलिस स्थानकात हार्दिक हेमचंद सोनी रा. दिपनगर ता. भुसावळ विरुद्ध जातिय वाचक शिवीगाळ प्रकरणीअॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेहार्दिक हेमचंद सोनी रा.पीई १/१बीटीपीएस कॉलनी. बुध्दविहारा जवळ दिपनगर गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असुन याचे एका ३८ वर्षीय एका नोकरीस असलेल्या मागासवर्गीय महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखऊन अनैतीक संबध जुळवले असता त्याने महीलेवर वारंवार अत्याचार करून ५ / १२ / २०२१ रात्री १० वाजता ते ता. ६ / ६ / २०२४ रात्री ११ वाजेदरम्यान बीटीपीएस कॉलनी बुद्धविहारा जवळ दीपनगर क्वाटर क्र.पीई ३/१ येथे हार्दिक सोनी याने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करून लग्नास नकार देत तूझे बाहेर लोकांशी अनैतीक संबध आहेत असे खोटे आरोप करून तूझे माझ्या मोबाईलमध्ये अक्षेपार्ह फोटो आहेत ते व्हायलर करण्याची धमकी देत जातीय वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सदर महीलेने बुधवार ( ता. ११ ) रात्री १० वाजता भुसावळ तालुका पोलिस स्थानकात भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनात हार्दिक सोनी विरूध्द ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्या आला असुन पोलिस कर्मचारी अनिल झुंझारराव, संजय तायडे तपास करीत आहे.