Thursday, November 21, 2024
Homeरावेरतालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी "इनोव्हा वाहन" सोडून महागड्या खोक्याक्या संपर्कात !

तालुक्यातील महत्त्वाचे पदाधिकारी “इनोव्हा वाहन” सोडून महागड्या खोक्याक्या संपर्कात !

आर्थिक लाभासाठी प्रत्यक्ष जनतेशी संपर्कात असणाऱ्या उमेदवारांना डावलण्याचा प्रयत्न! 

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आचारसंहिता गेल्या दोन दिवसापासून सुरू झाली असली तरी रावेर विधानसभा मतदारसंघात मात्र यावल तालुक्यातील काही महत्त्वाचे पदाधिकारी हे गेल्या महिना दोन महिन्यापासून आपले लोकप्रिय “इनोव्हा वाहन” सोडत खोक्याच्या संपर्कात राहात असल्याचे तसेच ८ ते १५ दिवसापासून फैजपूर ते साकळी परिसरात ओल्या पार्ट्यांमध्ये उपस्थित राहत असल्याने मतदारांमध्ये नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे नेमकी कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल तसेच रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा महम्मद यांची उमेदवारी नेमकी कोणत्या राजकीय पक्षातर्फे किंवा अपक्ष राहणार किंवा कसे..? याबाबत तसेच प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अनिल चौधरी यांच्या वाढत्या जनसंपर्क बाबत आणि भारतीय जनता पार्टी पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या सामाजिक राजकीय प्रतिष्ठेबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघात संपूर्ण राज्याचे लोकप्रिय स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांचे पुत्र आमदार शिरीषदादा चौधरी हे आपल्या राजकीय वारसासाठी धनंजय चौधरी यांच्यामार्फत या अतिशय प्रतिष्ठेच्या राजकीय लढाईत आपले चक्रव्यूह रचना कोणत्या पद्धतीने आखणार आहेत..? आणि या चक्रव्यूह राजनीति मध्ये भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यामार्फत रावेर विधानसभा मतदारसंघात आपल्यासाठी कसे पोषक वातावरण निर्माण करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.भारतीय जनता पार्टीत मात्र लोकसभा निवडणुकीचा आढावा आणि त्यांना मिळालेले यश लक्षात घेता रावेर विधानसभा मतदारसंघात सर्व प्रकारची चाचणी केल्यावर सुद्धा उमेदवारी निश्चित करणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी फक्त धनशक्तीलाच प्राधान्य दिले तर, आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण रावेर विधानसभा गेल्या ५ वर्षात कोणत्या उमेदवाराचा जनसंपर्क प्रत्यक्ष दांडगा आहे आणि सर्वसामान्यांसाठी विविध योजना विविध जनहिताची कामे,उपक्रम कोणी राबविले त्याकडे जर पक्षश्रेष्ठींनी जर दुर्लक्ष केले तर याचा फायदा मात्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांना झाल्याशिवाय राहणार नाही असे उघडपणे संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघातील सर्वस्तरीय समाजात राजकारणात सहकारात आणि विशेष करून माध्यमिक व उच्च शैक्षणिक विभागात,व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या