दीपनगर कामगार कल्याण केंद्रा तर्फे नेत्र तपासणी शिबीर संपन्न
दीपनगर:- दिपनगर औष्णीक विद्युत प्रकल्प भुसावळ येथील कामगार कल्याण केंद्रात गुरूवार ( ता. १९ ) अधिकारी, कंत्राटदार मजूर, कर्मचारी यांच्या करिता मोफत नेत्र विकार तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष – पंकज सनेर, कल्याण अधिकारी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर. कार्यक्रम पाहुणे – सचिन भावसार उपाध्यक्ष कंत्राटी वीज कामगार संघटना दिपनगर. विशेष उपस्थिती – .प्रफुल्ल आवारे गुणवंत कामगार दिपनगर व नेत्र तपासणी साठी आलेले डॉक्टर – राहुल पवार सेवालाल नेत्रालय
जळगाव. यांनी आधुनिक यंत्रा द्वारे डोळ्यांची तपासणी केली.या शिबीराचा सत्तर रुग्णांनी लाभ घेतला.
सध्या शहरात अनेक सामाजिक संस्था एकमेकांना सहकार्य करून विविध सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम घेऊन सामाजिक कार्य करीत आहेत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे. या शिबिरात पहिल्या ७० गरजूंची मोफत नेत्र तपासणी केल्या त्यामुळे केंद्राकडून आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला फिरते नेत्रचिकित्सालातील नेत्र तज्ञांकडून या शिबिरात गरजूंची नेत्र तपासणी करण्यात आली शिबीर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन किशोरकुमार मनोहर पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दिपनगर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. शारदा भावसार व ललित माळी. प्रवीण महाजन यांनी परिश्रम घेतले.