Saturday, April 19, 2025
Homeजळगावदुचाकीस्वाराला डंपरने दिली जोरदार धडक; वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव !

दुचाकीस्वाराला डंपरने दिली जोरदार धडक; वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव !

दुचाकीस्वाराला डंपरने दिली जोरदार धडक; वाहतूक पोलिसांनी वाचविला जीव !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एमआयडीसीतून शहराकडे येणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. दरम्यान, दुचाकीस्वार हा थेट डंपरच्या पुढील चाकाखाली आला. यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या वाहतुक पोलिसांनी त्या दुचाकीस्वाराला सुखरुप बाहेर काढत त्याचा जीव वाचवला. या अपघातात दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. ही घटना दि. १७रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, शहरातील एमआयडीसीकडून खडीने भरलेला (एमएच १९, सीव्ही ५९१५) क्रमांकाचा डंपर भरधाव वेगाने शहराच्यच्या दिशेने येत होता. यावेळी डंपरच्या पुढे चालणाऱ्या दुचाकीस्वाराला डंपरने जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीस्वारा हा रस्त्यावर कोसळल्याने त्याची दुचाकी थेट डंपरच्या पुढील चाकात अडकली. काही अंतरापर्यंत डंपरने दुचाकीला फरफटत नेले. यामध्ये दुचाकीस्वार हा किरकोळ गंभीर जखमी झाला. ही घटना अजिंठा चौफुलीवर कर्तव्यावर हजर असलेले वाहतुक शाखेचे पोहेकॉ गुणवंत देशमुख व विठ्ठल मुंडे यांना समजली.डंपरने दुचाकीला चिरडल्याचे दिसताच प्रसंगावधान राखत वाहतुक पोलीस देशमुख आणि मुंडे यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी फरफटत नेणाऱ्या डंपरच्या खाली अकडलेल्या दुचाकीस्वाराला बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या