Thursday, November 21, 2024
Homeजळगावदेशाची एकात्मता व एकसंघता अबाधित राखावी- प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे

देशाची एकात्मता व एकसंघता अबाधित राखावी- प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे

देशाची एकात्मता व एकसंघता अबाधित राखावी- प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे
फैजपूर : प्रतिनिधी  खानदेश लाईव्ह न्युज
स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतानाच एक भारतीय म्हणून पालन करावयाची कर्तव्य व परिवारासहित, समाज, देश व पर्यावरणासाठी चे उत्तरदायित्व प्रत्येकाने ओळखून *बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो* यासाठी प्रयत्नरत असावे. जात, पात, धर्म, संप्रदाय या पलीकडे जाऊन भारताची एकात्मता व एकसंघता राखण्यात प्रत्येकाने समर्पित झाले पाहिजे असे आवाहन प्राचार्य राजेंद्र बी वाघुळदे यांनी केले.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात औषध निर्माण पदविका महाविद्यालय, माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्य दिवसाच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी प्राचार्य आर एल चौधरी, प्राचार्य आर वाय चौधरी यांच्यासहित तीनही शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय छात्र सेनेचे बेस्ट कॅडेट म्हणून *ऋषिकेश कैलास पाटील* या कॅडेटचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी प्राचार्य संबोधनात, भारत देश इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेने अधिक प्रगतीपथावर असून सर्वात तरुण देश म्हणून आपली ताकद मोठी आहे. या तरुणांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून भारताला महासत्ता करण्यात विद्यार्थ्यांनी सहयोग द्यावा असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या