Wednesday, February 5, 2025
Homeजळगावधक्कादायक : मुलाला व्हिडीओ कॉल करीत वडिलांनी संपविले आयुष्य!

धक्कादायक : मुलाला व्हिडीओ कॉल करीत वडिलांनी संपविले आयुष्य!

धक्कादायक : मुलाला व्हिडीओ कॉल करीत वडिलांनी संपविले आयुष्य!

एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – कर्जबाजारीपणाला कंटाळून गणेश बंडू बडगुजर (६१, मूळ रा. खेडी कढोली, ता. एरंडोल, ह.मु, नवनाथ नगर, जळगाव) या व्यापाऱ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (३ फेब्रुवारी) रोजी रात्री जळगाव ते शिरसोलीदरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, गणेश बडगुजर यांनी मुलाला व्हिडीओ कॉल करीत आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कुटुंब धास्तावले व काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले. व्यापार असलेले गणेश बडगुजर यांनी व्यवसायासाठी कर्ज काढलेले होते. या कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते.तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ अनिल फेगडे, गुलाब माळी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या