Tuesday, April 29, 2025
Homeगुन्हाधक्कादायक : विमा पॉलिसी अपघातात लाभ मिळवण्यासाठी शालकाचा मेव्हण्याने केला खून !

धक्कादायक : विमा पॉलिसी अपघातात लाभ मिळवण्यासाठी शालकाचा मेव्हण्याने केला खून !

धक्कादायक : विमा पॉलिसी अपघातात लाभ मिळवण्यासाठी शालकाचा मेव्हण्याने केला खून !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जिल्ह्यातील अनेक ठिकाणी हाणामारी व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सख्या मेव्हण्याने शालकाच्या नावे असलेली विमा पॉलिसी व दिलेल्या स्कुटीचा अपघातात विम्याचा लाभ मिळवण्यासाठी फागणे येथील शालकास पारोळा हद्दीत ठार मारून त्याचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना देऊन बनवाबनवी केली होती.

याप्रकरणी मेव्हण्यासह त्याच्या एका साथीदारास पोलिसांनी सखोल माहितीच्या आधारे २७ रोजी ताब्यात घेतल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी पारोळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रारंभी १७ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मयत समाधान शिवाजी पाटील (वय २६) याचा पारोळा हद्दीत अपघात झाल्याची नोंद धुळे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. ही नोंद झिरो नंबरने पारोळा पोलीस ठाण्यात आल्यानंतर १९ रोजी अकस्मात मृत्यू म्हणून दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांच्याकडे देण्यात आला. या वेळी पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमरसिंह वसावे, हवलदार सुनील हटकर, किशोर भोई यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यात घटनेचे ठिकाण व घटनेचे स्वरूप हे संशयास्पद दिसून आले. यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व घटनेचे गांभीर्य पाहता घटनेचा सखोल तपास करण्याचे चौकशी अधिकारी पो.उ.नि. अमरसिंह वसावे, हवालदार सुनील हटकर, हवालदार संजय पाटील, हवालदार अनिल राठोड, हवालदार अभिजीत पाटील यांच्या पथकाला आदेश देण्यात आले. या पथकाने संशयित व इतर संबंधित व्यक्तींचे सर्व कंपनीचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे सीडीआर काढले. तर संदीप पाटील याने दिलेली खबर व प्रत्यक्षदर्शी पुरावे यात तफावत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तपास पथकाने घटना घडल्यापासून पारोळा शहर, अमळनेर शहर, धुळे अशा ठिकाणी तपास पथक रवाना करून सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती मिळवली.

धुळे येथून झिरो नंबरने अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. या घटनेबाबत पो.नि. सुनील पवार यांना तफावत आढळली. याबाबत त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तपास अधिकारी म्हणून उपनिरीक्षक अमरसिंह वसावे यांच्याकडे जबाबदारी दिली. या वेळी त्यांच्या पथकाने घटनेच्या मुळात जाऊन सत्य समोर आणले. अकस्मात मृत्यू हा अपघात नव्हे तर पैशांचा हव्यासापोटी केलेला खून आहे, याची सिद्धता स्पष्ट करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यामुळे पारोळा पोलिसांच्या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या