धक्का लागल्याच्या कारणावरून दोघं भावांना जबर मारहाण ; गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रस्त्याने जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून सतीश भीमा गवळी (५५, रा. प्रजापतनगर) व त्यांचे भाऊ अशोक भीमा गवळी यांना पाच जणांनी लाकडी काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी बळीराम पेठेत घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतीश गवळी हे रस्त्याने जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला व पाच जणांनी दोघा भावांना लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सतीश गवळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश पाटील करीत आहेत.