नगरपरिषद संचलित माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होत नसल्याने शासनाला लाखो रुपयाचा चुना लावला जात आहे.
यावल दि.१८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी नगरपरिषद संचलित माध्यमिक शाळा आहे या शाळांपैकी काही माध्यमिक शाळांमध्ये सरप्लस तथा अतिरिक्त शिक्षक आहेत. वशिलेबाजीमुळे ह्या शिक्षकांचे समायोजन होत नसल्याने शासनाला दर महिन्याला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की
जळगाव जिल्ह्यात नगरपरिषद संचलित अनेक ठिकाणी माध्यमिक शाळा आहेत त्यापैकी काही माध्यमिक शाळांमधील अंदाजे १०० ते १५० शिक्षक अतिरिक्त आहेत आणि त्यांना पद्धतशीरित्या दर महिन्याला वेतन दिले जात आहे.या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होत नसल्याने शिक्षण संचालक,उपसंचालक यांच्यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव आणि नगरपालिका शाखेचे सामान्य प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून केला जात आहे आणि यामुळे आणि बनावट दस्तऐवज तयार करून शासनाच्या तिजोरीला दर महिन्याला संगणमताने लाखो रुपयाचा चुना लावला जात असल्याची सुद्धा चर्चा आहे. समायोजन होत नसल्याने संबंधित शिक्षकांच्या यादीसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसेच आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे लवकरच तक्रार दाखल होणार असल्याची चर्चा आहे.