नवयुवक गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम…
शहराची सफाई करणाऱ्या धर्म बंधुंनच्या हस्ते गणपतीची आरती
फैजपुर : प्रतिनिधी खानदेश लाईव्ह न्युज
येथील सतपंथ मंदिराजवळील किरंगे वाड्यात नवयुवक गणेश मंडळाने यावर्षी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या सर्व समाजाने मिळून शांततेत व उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या समाजाच्या भाविकांना गणपती बाप्पांची आरती करण्याचा सन्मान दिला जात आहे. यात आज महाकाल सेना मेहतर समाजाच्या गावाची
साफसफाई करणारे धर्मबंधू यांना आरतीचा मान देण्यात आला. या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वागत करून त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. अशा प्रकारे पुढील प्रत्येक दिवशी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविले जाणार आहे. फैजपूर शहरात असे प्रथमच उपक्रम हाती घेण्यात आले. यात शहरात उपयुक्त काम करत असलेल्या सर्व जाती धर्माच्या समाजसेवा करणाऱ्या व्यक्तींचे स्वागत करून सन्मान केला जात आहे. असा अनोखा उपक्रम नवयुवक गणेश मंडळांने हाती घेतल्याने सर्वत्र कौतुक व चर्चेचा विषय होत आहे. नवयुवक गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्यासह सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.