न्यायालयीन आदेशात आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
यावल दि.२ ( सुरेश पाटील ) न्यायालयीन आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी हे पोलीस बंदोबस्तासह रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी ४ जणांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने यावल पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सार्व.बांधकाम उपविभाग यावल कार्यालयातील सहाय्यक अभियंता केतन अशोक मोरे वय ३२ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बुधवार दि.२९ रोजी आम्ही कार्यालय स्टॉफ व यावल पोलीस स्टॉफ सरकारी वाहन क्र. एमएच-१९-ई ए – ६४१० सह अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही कारणे कामी रवाना झालो.हरीपुरा वड्री रस्ता प्रजिमा ११ हडकाई नदीवर पुलाचे बांधकाम झालेले असुन तसेच उर्वरीत पोच मार्गाचे काम प्रगतीत आहे. सदर ठिकाणी
शेती गट ८९ जवळ रशीद रमजान तडवी याने पोच मार्गांचे अतिक्रमण करुन फळबाग लावलेले आहे. तसेच त्यांचा मा.न्यायालयातील मनाई हुकूमाचा अर्ज मा.सह दिवाणी न्यायधीश वरीष्ठ स्तर दि.१७ जानेवारी २९२३ च्या
आदेशानुसार नामंजुर केला आहे. तसेच वेळोवेळी रस्ता रहदारीस मोकळा करण्यास गेले असता सदर ठिकाणी आम्हांस अडथळा केला आहे.त्यानुषंगाने आम्ही मा. सह दिवाणी न्यायधीश वरीष्ठ स्तर याच्या आदेशाचे पालन
व्हावे म्हणुन दि.२९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्त सह व सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल येथील उपविभागीय आधिकारी जहांगीर शाहुखाँ तडवी,कनिष्ठ अभियंता
पंकज कोळी,कनिष्ठ अभियंता हर्षल कवीश्वर,तसेच यावल पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार पो.हे.काँ.१३६९ राजेंद्र पवार,पो. हे.काँ.३३१ सुनिल पाटील पो.काँ २७७० अल्लाउद्दीन तड़वी,मपोकाँ २५३९ सपना सोनवणे असे अतिक्रमण काढणे साठी बंदोबस्त कामी हजर होते.अतिक्रमण काढणे साठी आवश्यक असलेली जेसीबी मशीन ने काम चालु असताना ऑपरेटर नामे पियुष कुमारच्या याच्या साह्याने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही चालु
असताना सदर ठिकाणी इसम नामे रशीद रमजान तडवी याचा मुलगा १) संजय रशीद तडवी, २) नातु शकील रशीद तडवी, ३) नाव माहीत नाही, त्यांची पत्नी ४ ) नाव माहीत नाही अशांनी जेसीबी मशीन समोर येवुन आरडा ओरड करुन आम्ही तुम्हाला अतीक्रमण काढु देणार नाही तुम्ही येथुन परत निघुन जा नाही तर साहेब आम्ही तुम्हाला
सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांनी सदर इसमाना JCB मशीन समोरुन बाजुला केले. त्यावेळी सदर लोकांनी आमचेशी हुज्जत घालुन आम्हास सदर ठिकाणाहून मागे ढकलून
देवुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यावेळी मी शकील तडवी या इसमाला मा.सह दिवाणी न्यायधीश वरीष्ठस्तर भुसावळ यांच्या आदेशाचे लेखी प्रत दाखवित असताना सदर न्यायालाचे आदेश आम्हांस मान्य नाही असे
बोलुन त्यांने देखील मला सदर ठिकाणी छातीवर धक्का मारुन मागे लोटले. तरी दि. २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुगारास शेत शेत गट ८९ वड्री गावा जवळ हरीपुरा ते वड्री रस्ता प्रर्जिमा ११ चे अतिक्रमण काढण्याची कारवाई करीत असताना रशीद रमजान तडवी याचे नातेवाईक म्हणजे मुलगा १)संजय रशीद तळवी तसेच २) नातू शकील ऋषी तडवी ३) दुसरा नातू पूर्ण नाव माहित नाही रशीद रमजान याचे, ४) पूर्ण नाव माहित नाही. यांनी आपसात संगणमत करून मला व माझे सोबतचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अतिक्रमण काढण्याचे कारवाई करीत असताना धक्का मारून अडथळा निर्माण केला व आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिली.अशी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनला बीएनएस २०२३,१३२, बी एन एस २०२३, ३५१ ( १ ), ३५१ ( २ ), ३ ( ५ ) नुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कारवाई करताना व्हिडिओ चित्रण केले त्याचे काय..?
शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस दलाला दमदाटी इत्यादी प्रकार घटनास्थळी घडला आणि त्याचे व्हिडिओ चित्रण सुद्धा करण्यात आले त्या व्हिडिओ चित्रण नुसार योग्य ती कारवाई होत आहे किंवा नाही याकडे राजकारणासह ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे. व्हिडिओ चित्रणाची चौकशी झाल्यास या प्रकरणात जास्त आरोपी निष्पन्न झाले तर दंगलीछा सुद्धा गुन्हा दाखल होईल का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.