Tuesday, December 3, 2024
Homeगुन्हापतीचा थरार : चरित्र्यावर संशय, पत्नीच्या डोक्यात घातला कोयता !

पतीचा थरार : चरित्र्यावर संशय, पत्नीच्या डोक्यात घातला कोयता !

पतीचा थरार : चरित्र्यावर संशय, पत्नीच्या डोक्यात घातला कोयता !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पतीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत मारहाण केली. यानंतर लोखंडी कोयता डोक्यात घातला. यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहेत. भुसावळ शहरातील फेकरी शिवारात पती सचिन किशोर बोराडे हा पत्नीवर चरित्र्यावर संशय घेत होता. गुरुवारी पत्नीवर संशय घेत मारहाण केली. यानंतर त्याने थेट कोयता तिच्या डोक्यात घातला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या