Saturday, April 19, 2025
Homeगुन्हापत्नीचा खून करून पती स्वतः पोलिस स्थानकात हजर !

पत्नीचा खून करून पती स्वतः पोलिस स्थानकात हजर !

पत्नीचा खून करून पती स्वतः पोलिस स्थानकात हजर !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरुन आशा संतोष तायडे (वय ३८, रा. आभोडा, ता. रावेर) यांचा पतीने गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवार दि. १ एप्रिल रोजी उघडकीस आली. खून केल्यानंतर पती स्वतः पोलीस ठाण्यात येवून त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार रावेर पोलिसांनी संशयित संतोष शामराव तायडे या पतीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, रावेर तालुक्यातील आभोडा या गावात आशा शामराव तायडे ही महिला आपला पती संतोष शामराव तायडे सह वास्तव्याला होत्या. शेती व मजुरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. पती संतोष तायडेला तिच्या चारित्र्यावर संशय होता. तिच्याकडे असलेले पैसे तिने कुणाला दिले हे सांगण्यासाठी ती टाळाटळ करीत होती. विवाहिता गाढ झोपेत असताना तिच्या चारित्र्यावर घेणाऱ्या पतीने पहाटे चार वाजेच्या सुमारास पत्नीच्या अंगावर बसून त्याने दोन्ही हाताने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर सकाळी आठ वाजेचे सुमारास संतोष तायडे हा स्वतः पोलीस ठाण्यात जावून त्याने पोलिसांना खूनाची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील, उपनिरीक्षक दिपाली पाटील, पोहेकॉ ईश्वर चव्हाण, कल्पेश आमोदकर, मुकेश मेढे, संदीप पाटील, अतुल गाडीलोहार यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांनी भेट दिली. पोलीस पाटील राजू नुरखा तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष तायडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या