Friday, November 22, 2024
Homeगुन्हापारोळा पोलीस स्टेशन कडुन ईलेक्ट्रीक तार चोरीच्या

पारोळा पोलीस स्टेशन कडुन ईलेक्ट्रीक तार चोरीच्या

पारोळा पोलीस स्टेशन कडुन ईलेक्ट्रीक तार चोरीच्या गुन्हयाची उकल केले बाबत.. पारोळा पो.स्टे. प्रभारी अधिकारी श्री. सुनिल पवार सो यांना गोपनिय माहिती मिळाली होती

कि सांगवी ता पारोळा गावाचे शिवारात महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ चे ईलेक्ट्रीक प्रवाह करणारे पोलवरील अॅल्युमिनीयम तार चोरी करणारी टोळी संशयीतरित्या फिरत असलेबाबत माहीती प्राप्त झाल्याने सदर बाबत खात्री करणे कामी तात्काळ पोउनि राजु विठ्ठल जाधव, पोहेको ४१८/सुनिल हाटकर, पोहेकौं २७१८/प्रविण पाटील, पोकौं ८५०/अशिष गायकवाड, पोकों योगेश शिंदे, पोका चा अनिल वाघ अशांना सरकारी वाहनाने रवाना केले असता सदर परिसरात नमूद पथकास ईसम नामे समाधान नारायण पाटील रा-एरंडोल हा चार चाकी वाहन क्र.MH१९४११९२ काळी-पिवळी टॅक्सी हिचे सह सांगवी ता पारोळा गावाचे शिवारात इले.डी.पी. जवळ मिळुन आला त्याचे कडेस अधिक चौकशी करता तो उडवा उडविची उत्तरे देता होता त्याची अधिक चौकशी करता त्याचे कब्जात एक तार कापण्याची पक्कड मिळुन आल्याने त्यास अधिक चौकशी करता त्याने माहीती दिली की, माझे सोबत अजुन दोन साथीदार नामे १) रविंद्र अनिल मिस्तरी रा-साईनगर एरंडोल, व २) धनराज प्रकाश ठाकुर रा-अमळनेर दरवाजा एरंडोल असे असुन ते पळुन गेले आहे असे सांगीतलेने नमुद ईसमास अधिक चौकशी कामी पो स्टे येथे आणुन त्याचे दोन साथीदार यांचा वर नमुद पोलीस पथकाने तात्काळ अंत्यंत शिताफीने शोध घेवुन ताब्यात घेतले व पो स्टे ला आणुन त्यांचे कडेस अधिक चौकशी करता वरील तिन्ही आरोपीतांनी पारोळा पो स्टे हद्दीत दोन वेग वेगळया ठिकाणी व एरंडोल पो स्टे हद्दीत तीन वेग वेगळया ठिकाणी ईलेक्ट्रीक अॅल्युमिनीयम तार चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याबाबत पारोळा पो स्टे कडील दोन वेग वेगळे गुन्हे व एरंडोल पो स्टे कडील तीन वेग वेगळे गुन्हे उघकीस आले आहे.

सदर कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेडडी पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, मा सुनिल नंदवाळकर उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या