Thursday, November 21, 2024
Homeजळगावपाल आश्रमात भव्य आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णाची मोफत तपासणी

पाल आश्रमात भव्य आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णाची मोफत तपासणी

पाल आश्रमात भव्य आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णाची मोफत तपासणी
पाल ता रावेर :- परम पूज्य ब्रम्हलीना सद्गुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या ५६ व्या अवतरण दिनानिमित्त श्री वृंदावन धाम पाल आश्रमात गोदावरी फाउंडेशन तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दी १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.त्यात किमान दोनशे च्या वर रुग्णाची विविध आजारावर करण्यात आली असून परिसरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. यासाठी दुपारी बारा वाजेपासुन तर चार वाजेपर्यंत रुग्ण तपासणी करण्यात आली असून याकरिता गोदावरी फाउंडेशन जळगाव तर्फे डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महविद्यालया तुन मार्केटिंग विभाग प्रमुख रत्नशेखर जैन,हृदय रोग चे डॉ निखिल,जनरल तपासणी चे डॉ आचल,जनरल सर्जरी चे डॉ सहेर,अस्थिरोग विभाग चे डॉ नरेंद्र,डॉ वेदांत,स्री रोग विभाग डॉ तेजस,बाल रोग विभाग डॉ खुशाल,नाक कान घसा चे डॉ फैजल,नेत्र रोग विभाग डॉ निशा,डॉ रोहित,भीरुड मॅडम,विजय राजपूत तसेच नर्सिंग आदिनी तपासणी केली.

 


परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजिच्या अवतरण दिनानिमित्त श्री हरिधाम मंदिरात स्थित समाधि स्थळी पादुका पूजन करून पाल गावात भक्ति सभेच्या माध्यमातून हरिनाम संकीर्तनाने शोभायात्रा काढण्यात आली.त्यानंतर आश्रमात ब्रम्हचारी संत श्री दिव्य चैतन्य जी महाराज यांचे सत्संग अमृताचा कार्यक्रम तसेच ५६ व्या अवतरण दिनाचे औचित्य साधुन परिसरातील विधवा महिलांना वस्र वाटप करून महाआरती पच्यात महाप्रसाद वितरण करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या