पाल येथील शंकर महाराज अनंतात विलीन
चैतन्य साधक परिवार शोक सागरात
रावेर तालुक्यातील पाल येथील अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे संस्थापक सद्गुरू ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे वडील श्री शंकर महाराज हे सात नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ऐशीव्या वर्षी अनंतात विलीन झाले आहे .
त्यांच्या निधनाने पाल परिसरासह अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारात शोककळा पसरली आहे .
आठ नोव्हेंबर रोजी पाल गावात हरी नाम संकीर्तनाने त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती यावेळी हजारो चैतन्य साधक परिवार सह संत यांच्या उपस्थिती होती
त्यांच्या वर श्री वृंदावन धाम पाल आश्रमात अंतिम संस्कार करण्यात आले आहे .
त्यांनतर पाल आश्रमाचे पदस्थ श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य जीं महाराज यांच्या सानिध्यात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे .
त्या वेळी श्रद्धेय बाबाजी यांनी कै. शंकर महाराज यांना परमेश्वराच्या चरणी स्थान मिळो त्याचबरोबर जसे जुने वस्र काढून आपण नवीन वस्र परिधान करितो तसेच आत्मा अमर असून फक्त शरीर रुपाने आपल्यातून गेलेले असून नवीन वस्र प्रमाणे आत्मा परत शरीर धारण करते या साठी या मृत्युंलोकातून मनुष्याला शरीर त्याग करून एक दिवस जाण हे अटळ आहे अशी भावना करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .
या अंतिम संस्कार प्रसंगी श्री विष्णुजी महाराज, सुखदेव चैतन्य महाराज, आनंद चैतन्य महाराज,श्याम चैतन्य महाराज, शिव चैतन्य महाराज, दिव्य चैतन्य महाराज, महेश चैतन्य महाराज, नवनीत चैतन्य महाराज, राधे चैतन्य महाराज, ब्रज चैतन्य महाराज, सर्व चैतन्य महाराज,शांती चैतन्य जी महाराज, ऋषीं चैतन्य महाराज, ललित चैतन्य महाराज,राम चैतन्य महाराज,शुभ चैतन्य महाराज , पंडीत रामहरी भाईजी ,आदी सह संत उपस्थित होते.