प्रेमसंबंधाच्या संशय : एकाने केला तिघांवर चाकूहल्ला !
अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाने तिघांवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील जानवे येथे २४ रोजी रात्री १० वाजता घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, विजय ऊर्फ भाया साहेबराव पारधी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गावातीलच अजय पारधी हा विजयची मावस बहीण सुनीता, पती राजेंद्र आणि मुलगा भटू यांना शिवीगाळ करत होता. भटुवर प्रेमसंबंधांचे आरोप करत मारण्याची धमकी देत होता. त्याचवेळी सुवालाल पारधी, भास्कर पारधी यांनी अजय याला समजावण्याचा प्रयत्न केला.
त्याने शिवीगाळ सुवालाल, विजय आणि भारस्कर पारधी यांच्यावर चाकुने वार केले. यात अजयची आई मुन्नीबाई हीदेखील जखमी झाली. विजयच्या जबाबानुसार आरोपी अजय पारधीवर भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११८(२), ३३३, ३५१ (२), ३५२ १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विकास देवरे, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गुन्ह्यांचा तपास पोलिस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.