फैजपूरच्या लक्ष्मीनारायण मंदिरात महालक्ष्मी ( गौरी पूजन )
फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – फैजपूर परिसरात जेष्ठाकनिष्ठा गौरीचे आगमन दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी झाले असुन लक्ष्मीनारायण मंदिरात महालक्ष्मी (गौरीपूजन) करण्यात आले आहेत. दिनांक १० सप्टेंबर रोजी १२ ते १ च्या सुमारास पूजन व नैवद्य दाखवण्यात आला आहे. दिनांक ११ सप्टेंबर ला ही पूजन होईल . देवस्थानचा परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आली आहे. देवस्थानात जेष्ठ कनिष्ठ गौरीचे आगमन झाल्याने भक्तगण दर्शनास सज्ज झाले आहे.
खान्देशात या जेष्ठाकनिष्ठा गौरी म्हणून ओळखल्या जातात. दोन्ही बहिणी जेष्ठाला भेटायला कनिष्ठा येते. या महालक्ष्मीपुढे सुदंर आरास केली गेली आहे. महालक्ष्मीपूढे बाळ, गणपती असतो . जेष्ठा कनिष्ठा गौरीचे मोठया उत्सहात आगमन दि. १०रोजी झाले. असून गौरींना कढी – भाकरीचा नैवद्य देतात ,१६ प्रकारच्या भाज्या , पुरणपोळी, दूध साखर, असते दुसऱ्या दिवशी म्हणजे महापूजेला पुरणाचीपोळी दाखवला जातो,१६ पुरणाचे दिवे आरती लावली जाते .जेष्ठाला व कनिष्ठाला ८ सुताची पायती १६.८ ची असतात या दिवशी सुवासिनींना जेवणाला बोलवून साडी चोळी देऊन ओटी भरतात. संध्याकाळी हळदी कुंकवाचा कर्यक्रम असतो. फुगड्या झिम्मा ,पिग्गा घालून जागरण करतात . अशी परंपरा लाभली आहे. भाद्रपदातील गौरीचे आगमन अनुराधा नक्षत्रावर होते . जेष्ठ नक्षत्रावर महापूजा होते व मूळ नक्षत्रावर दिनांक १२रोजी विसर्जन होते . फैजपूर लक्ष्मीनारायण मंदिरात असंख्य भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत तांदूळ गव्हाच्या रासी भरतात, फराळा चे समोर ठेवतात, धातूचा मुखवटा सुदंर असतो, त्याला वेंणी, कानातले,गळ्यातले,सुदंर नऊवारी साडी अगावर डोक्याच्या बिंदीपासून, गळ्यातील विविध दागिने,मंगळसूत्र,कंबरपट्टा, बाजूबंद यासह अनेक दागिन्यांनी सजवतात. ३ दिवस भक्तीमय वातवरणात या जेष्ठा कनिष्ठांचे मनोभावाने भाविक या देवस्थानातं पूजन करतात व तिसऱ्या दिवशी गूळपोळी ,दहीभात याचा नैवेद्य देतात भक्तीमय वातावरणात या जेष्ठ व कनिष्ठला निरोप दिला जातो. अशी आख्यायिका असलेल्या श्री लक्ष्मीनारायण मंदिरात जेष्ठा कनिष्ठा गौरीचे दर्शन व प्रसादाचा लाभ भाविक भक्त मंडळींनी घ्यावा ,असे आवाहन पुजारी प्रवीण दिनकर जोशी व महेश दिनकर जोशी यांनी केले आहे.