Thursday, November 21, 2024
Homeजळगावनगरपालिकेच्या म्युनिसिपल हायस्कूलची दयनीय अवस्था ; जनार्दन महाराजांनी दिली शाळेला भेट!

नगरपालिकेच्या म्युनिसिपल हायस्कूलची दयनीय अवस्था ; जनार्दन महाराजांनी दिली शाळेला भेट!

वर्गांमध्ये साचले पाणी म्हटलं तर विषय शिकवायला शिक्षकच नाही…

जनार्दन महाराजांनी दिली शाळेला भेट!

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शाळेच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी सूचना अर्ज देऊनही उपयोग होत नसल्याने शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींनी थेट महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांची भेट घेऊन मुन्सिपल हायस्कूलच्या दयनीय अवस्थेचा पाढाच वाचून समस्या सोडवण्याची गळ घातली.


येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या नगरपालिकेच्या मुन्सिपल हायस्कूलची बाप भीक मागू देई ना आणि आई जेवण देई ना अशी अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. शाळेत शिकणाऱ्या मुला मुलींना अनेक विषयांचे शिक्षकच उपलब्ध नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास जबाबदार कोण ? विज्ञान विषयाच्या प्रयोग शाळेत प्रॅक्टिकल साठी मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध असूनही प्रयोगशाळेची दयनीय अवस्था पाहता तेथे पावसाचे पाणी साचले आहे तर वरील स्लॅबचे प्लास्टर पडून भगदाड पडण्याच्या तयारीत असल्याचे दृश्य दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगावर प्लास्टर पडून काही दुर्दैवी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? प्रयोगशाळेच्या अशा दयनीय अवस्थेमुळे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल होत नाही. पूर्ण इमारत जीर्ण झाली असून ठीक ठिकाणी तडा गेलेल्या आहेत.

या शाळेत ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जबाबदार कोण ? हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची संतप्त भावना महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी व्यक्त केली. विद्यार्थी व पालकांचा उद्रेक होण्यापूर्वीच शासन प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घ्यावी असे त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले. दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून फैजपूर नगरपालिकेला कायम मुख्याधिकारी नसल्याने अनेक समस्या निर्माण झाले आहेत. त्यांनी उपविभागीय अधिकारी प्रांत बबनराव काकडे यांच्याशी संवाद साधून या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याचे सांगितले. इंग्रजी व काही विषयांचा एकही तास झाला नसल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नसल्याची गंभीर बाब समोर आली. दरम्यान शिक्षक पालक संघ व भारत मुक्ती मोर्चा यांनी प्रांत कार्यालय व शाळा प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला असून तात्काळ समस्यांना सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या