Friday, November 22, 2024
Homeजळगावबदलापूर येथील महिला पत्रकारास अपमानास्पद वागणुकीचा "व्हॉइस ऑफ मीडिया" तर्फे तीव्र निषेध

बदलापूर येथील महिला पत्रकारास अपमानास्पद वागणुकीचा “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तीव्र निषेध

बदलापूर येथील महिला पत्रकारास अपमानास्पद वागणुकीचा “व्हॉइस ऑफ मीडिया” तर्फे तीव्र निषेध

अमळनेर तहसीलदाराना दिले निवेदन.

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकनासाठी गेलेल्या एका महिला पत्रकारास माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेने त्याची संस्कृती खड्ड्यात घालून दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे अमळनेर येथील तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना आज निवेदन देण्यात दिले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बदलापूर पूर्वे मधील एका नामांकित शाळेत मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. अत्याचार झाल्याच्या या घटनेने संपूर्ण देश अस्वस्थ होऊन सर्वत्र पडसाद उमटले आहेत.या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका महिला पत्रकार यांना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी त्यांची संस्कृती खड्ड्यात घालून महिला पत्रकाराला अपमानास्पद वागणूक देऊन माणुसकीला काळीमा फासली आहे.या घटनेचा “व्हाईस ऑफ मीडिया” या पत्रकार संघटनेतर्फे जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.याप्रकरणी गंभीर दखल घेऊन अपमानास्पद वागणूक देणाऱ्या त्या माजी नगराध्यक्षावर कडक कारवाई करावी म्हणजे भविष्यात प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना कोणी अपमानास्पद शब्द वापरणार नाही. अशाप्रकारे निवेदन देण्यात आले. व्हाईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आज निवेदन देण्यात आले.यावेळी साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे,सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे,सहसचिव ईश्वर महाजन,जिल्हा उपाध्यक्ष जयंत वानखेडे,उमेश धनराळे, बापूराव पाटील,कमलेश वानखेडे, दयाराम पाटील व जयेशकुमार काटे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या