Monday, February 3, 2025
Homeगुन्हाबस स्थानकातून खिशातून रोकड लांबविली !

बस स्थानकातून खिशातून रोकड लांबविली !

बस स्थानकातून खिशातून रोकड लांबविली !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बसमध्ये चढतांना महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल हजारी घेंगट (वय ६४, रा. कांचन नगर) यांच्या पॅन्टच्या चोर खिशातून २० हजार रुपये लांबवले. ही घटना दि. ३१ जानेवारी रोजी नवीन बस स्थानकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शहराती शनीपेठ परिसरातील कांचन नगरात अनिल घेंगट हे सेवानिवृत्त मनपा कर्मचारी वास्तव्यास आहे. दि. २८ रोजी त्यांनी मनपाच्या बँकेतून २३ हजार रुपये काढले होते. त्यानंतर दि. ३१ जानेवारी रोजी ते मुलगा व जावाईसोबत धुळे येथे महिला दक्षता समिती येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले. याठिकाणी भुसावळ ते नाशिक बस आल्याने ते तिघे बसमध्ये बसण्यासाठी गेले. यावेळी बसमध्ये प्रचंड गर्दी होती, याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी घेंगट यांच्या पॅन्टच्या चोर खिशातून २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. बसमध्ये चढल्यानंतर घेंगट यांना आपल्या खिशातून पैसे चोरी झाल्याचे लक्षात आले.
पैसे चोरी झाल्याचे लक्षात येताच, घेंगट हे मुलगा व जावाईसोबत बसमधून खाली उतरून त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. यावेळी पोलीस त्यांच्यासोबत बस स्थानकात आले. त्यांनी बस स्थानकात चौकशी केली, मात्र घेंगट यांना धुळे जाणे गरजेचे असल्याने ते तक्रार न देता धुळे निघून गेले. धुळे येथील काम आटोपून अनिल घेंगट यांनी शनिवार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या