बापरे : युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ट्रॅक्टर ट्रॉलीचा तुटलेला एक्सल दुरुस्तीसाठी लावलेला जॅक निसटल्यामुळे सोमनाथ गोरख कोळी ( २०, रा. भातखेडा, ता. एरंडोल) या मॅकेनिक सोबत आलेल्या तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील बोरनार गावात घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.बोरनार येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल दुरुस्तीसाठी भातखेडा येथून मॅकेनिक दुरुस्तीसाठी आले. ट्रॉलीला जॅक लावून काम सुरु असताना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक नेसटल्यामुळे सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेला. ग्रामस्थांनी जखमीला बाहेर काढले. एमआयडीसी पोलिसांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले.