Tuesday, December 3, 2024
Homeगुन्हाभुसावळात विवाहित महिलेचा विनयभंग करीत आई, भावाला जबर मारहाण !

भुसावळात विवाहित महिलेचा विनयभंग करीत आई, भावाला जबर मारहाण !

भुसावळात विवाहित महिलेचा विनयभंग करीत आई, भावाला जबर मारहाण !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील एका भागातील २३ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केला. ही घटना ९ रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी दोघाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहितेचा संशयित लखन परदेशी (वय २६) याने हात पकडून मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. तसेच करन परदेशी (वय २२) याने फिर्यादीच्या आई-वडिलांसह भावाला दमदाटी करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीना तडवी करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या