Friday, November 22, 2024
Homeजळगावभुसावळ रेल्वे जीआरपीच्या पथकाने ताब्यात घेतली गांधीधाम एक्सप्रेस मधून गांजाची बॅग

भुसावळ रेल्वे जीआरपीच्या पथकाने ताब्यात घेतली गांधीधाम एक्सप्रेस मधून गांजाची बॅग

भुसावळ रेल्वे जीआरपीच्या पथकाने  ताब्यात घेतली गांधीधाम एक्सप्रेस मधून गांजाची बॅग!

भुसावळ खानदेश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – ओरिसातून गुजरातमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या गांजाने भरलेली काळ्या रंगाची बॅग रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. भुसावळ रेल्वे प्लॅट फार्म क्रमांक तीन वर दुपारी ०२:०० वाजून १० मिनिटांच्या सुमारास विशाखापट्टणम – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी आली असता पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती व अकोला येथून डॉग स्कॉड येत असताना त्यांनी ती बॅग एक्सप्रेसच्या मागून दोन नंबरच्या बोगीत एक काळ्या रंगाची संशयास्पद बॅग आढळून आली..जीआरपी पोलिसांनी त्या डब्याला घेराव घातला.बोदवडहून सुद्धा याची खबर मिळाली होती . भुसावळचे जीआरपी अधिकारी श्री. मीना यांच्या पथक तात्काळ तैनात करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅग ताब्यात घेण्यात आली.. त्या बॅगमध्ये प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये साधारण ४ किलो गांजा पावडर आढळून आली. जागेवरच गांजा मोजण्यात आला. आणि पंचनामा केला.पोलिसांचा ताफा पाहून प्लॅट फार्म वरील प्रवाशांनी गर्दी केली. रेल्वे जीआरपी पोलिसांनी गांजा जप्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

गांजा वाहतूक व अन्य अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या विरुद्ध मोहीम हाती घेत लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात येत आहेत. भुसावळ रेल्वे हे देशात रेल्वेचे मुख्य जंक्शन असल्याने येथे भारताच्या विविध भागातून प्रवासी रेल्वे येत असतात. दरम्यान या याप्रकरणी कोणालाही ताब्यात घेण्यात आले नसून संशयिताचा पोलीस कसून शोध घेत आहेत..अशी माहिती मिळाली आहे की ,आंध्रप्रदेश , ओरिसा आणि अन्य ठिकाणाहून गांजा ,चरस विक्रीसाठी जात असतो.ओरिसातून हा गांजा आणण्यात आला होता असे समजले आहे. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या