भुसावळ विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आल्याचे वृत्त मिळत आहे . भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी पंधरा वर्षांनंतर हि जागा सोडण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यां मध्ये उत्साह व वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेस पक्षाला भुसावळ विधानसभेची जागा सोडण्यात यावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष श्रेष्ठी कडे वारंवार केली त्या अनुषंगाने भुसावळ विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माध्यमाला दिली आहे.
भुसावळ विधानसभेची जागा काँग्रेसला देण्यात आल्याचे समजल्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते जळगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये एकत्र जमले होते. यावेळी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणारे, इच्छुक उमेदवार बाळासाहेब प्रदीप पवार रवींद्र रखमाजी निकम , शैलेंद्र बोदडे , संतोष साळवे ,प्राध्यापक संदानशिव सर ,प्रवीण सुरवाडे, गजानन देशमुख ,कैलास शेळके सागर वानखेडे जितेंद्र चांगरे आदी उमेदवार बैठकीत मध्ये उपस्थित होते. यावेळी इच्छुक उमेदवारांची यादी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार व निरीक्षक डॉ. जगदीश चौधरी यांनी घेतली असुन ती वरिष्ठांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सांगितले आहे.
काँग्रेस पक्षाला जरी ही जागा सोडण्यात आली असली तरी देखील अजून निश्चित उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
महाविकास आघाडी कडुन निवडणूक लढवु इच्छीत असलेले डॉ. राजेश मानवतकर , प्रिती तोरण महाजन हे देखील या बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार का अशी चर्चा सुरू होती.
डॉ. राजेश मानवतकर किंवा प्रिती महाजन यापैकी एकाला उमेदवारी देण्यात येणार असल्याची हि माहिती मिळत आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते