भुसावळातील साक्री फाटा येथे शिवसेना शाखेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे हस्ते धडाक्यात उदघाटन !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – येथील साकरी फाटा येथे दि.01/02/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख श्री एकनाथराव शिंदे साहेब, मुक्ताईनगरचे लाडके आमदार श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नेतृत्वाखाली व प्रेरणेने व रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख श्री समाधानभाऊ महाजन यांचे हस्ते शिवसेना ( शिंदे गट) शाखेचे धडाक्यात उदघाटन करण्यात आले.
सदर प्रसंगी शिवसेना रावेर लोकसभा महिला जिल्हाध्यक्षा सौ. नंदाताई प्रकाश निकम, स्वाती भंगाळे, भारती भारुडे, कविता नहाले, वैशाली पाटील, संगीता भंगाळे, पूजा कोलते, नीता कोष्टी, मनीषा पाटील तसेच भुसावळ तालुका महिला शिवसेना प्रमुख वर्षा तल्लारे, मनोज साळवे, दुर्गेश बेदरकर, संतोष Sams तसेच हिप्पी शेठ हमीद आदी प्रमुख मंडळी उपस्थित होते.आज भुसावळ तालुका प्रमुख वर्षाताई तल्लारे यांचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने केक कापून त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.समाधान महाजन यांच्या नेतृत्वात रावेर मतदार संघान कार्यकर्त्याचा प्रवेश , शाखा उदघाटन सुरू आहेत तसेच विकास कामेही केली जात आहे .परिसरात शिंदे शिवसेनेची ताकद वाढत आहे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणूकीत त्याचा लाभ निश्चीत होईल .