Wednesday, November 20, 2024
Homeजळगावमतदान प्रक्रिया संपल्यानंतर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा जनसंपर्क सुरू.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा जनसंपर्क सुरू.

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा जनसंपर्क सुरू.

माजी सरपंच अनिल पाटील यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

यावल दि.२०  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  रावेर विधानसभा निवडणुकनिमित्त मतदान प्रक्रिया आज बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४ संध्याकाळी ६ वाजता संपल्यानंतर ७ वाजेच्या सुमारास यावल येथे धनंजय चौधरी यांच्या सदानंद इलेक्ट्रिकल दुकानात तालुक्यातील कोळवद ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी यावल शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आज मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या नियोजनानुसार जबाबदारी दिलेल्या आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी कशा पद्धतीने कामकाज केले याचा सुद्धा आढावा माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी स्वतः घेतला,आणि याबाबतची महत्त्वाची माहिती अनेकांनी त्यांना दिल्याचे सुद्धा समजले.तसेच शिरीषदादा चौधरी नेहमीप्रमाणे आपल्या वैयक्तिक, सामाजिक,राजकीय दैनंदिन कामकाजात सक्रिय झाले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या