मतदारांना जागृत करण्याचे कौतुकास्पद शासकीय काम केले सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले सरांनी.
रावेर विधानसभा मतदारसंघात निभावल्या वेगवेगळ्या भूमिका.
यावल दि.१८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघात यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड,गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली रावेर विधानसभा मतदारसंघात पथनाट्य,प्रवचनासह सांस्कृतिक मनोरंजक,लक्षवेधी कार्यक्रमाचे आयोजन करीत त्यात स्वतः व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून विविध भूमिका निभावून ‘मतदार राजा जागृत हो’ असे म्हणत मतदारांना जागृत करण्याचे शासकीय कौतुकास्पद काम केल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे यामुळे नक्कीच मतदान टक्केवारीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे साहेब, तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम सुरू होता आणि आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ ला असल्याने रावेर विधानसभा मतदारसंघात यावल रावेर तालुक्यामध्ये प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत जोमाने करण्यात आले.यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठीक ठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले जात आहे.यामध्ये मतदान करणारा प्रत्येक मतदार व त्याच्या कर्तव्या विषयी त्याला जाणीव करून दिली जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य केले आहे.यासाठी आज सरस्वती विद्यामंदिरच्या वतीने विशेष लक्षवेधी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. समाजातील विविध मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्काच्या संदर्भात जाणीव जागृती करून देत भारुड सादर करण्यात आले. कीर्तनात कीर्तनकार म्हणून डॉ. नरेंद्र महाले यांनी कीर्तन केले.साथ संगत ह.भ.प.संचित कोळी महाराज, मुख्याध्यापक जी.डी. कुळकर्णी व सरस्वती विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी दिली. यावल परिसरामध्ये प्रत्येक चौका चौकात, बस स्टँड आवारात,आणि एसटी बस मध्ये, विविध ठिकाणच्या गर्दीच्या ठिकाणी प्रबोधनाचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आले. याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावल पंचायत समितीच्या बीडिओ डॉ. मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांचे सहकार्य लाभत आहे.
यामध्ये यावल तालुक्याचे मतदान प्रबोधन सेलिब्रिटी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने डॉ.नरेंद्र महाले हे प्रबोधनाचे कार्य करत आहेत.
त्यांच्यासोबत सरस्वती विद्या मंदिर यावलचे मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी सर हे सुद्धा प्रबोधनाचे कार्य करीत आहे.रावेर विधानसभा,मतदार संघामध्ये भरगोस मतदान होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके साहेब यांचे सुद्धा योगदान लाभत आहे.लोकशाहीचे महत्त्वाचे दान म्हणजे मतदान हे करण्यासाठी प्रबोधनाचे समाजसेवेचे काम रावेर मतदारसंघात अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने सुरू आहे.सरस्वती विद्यामंदिर पुढाकाराने सामाजिक कार्याची मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव झाली.
कीर्तनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचून मतदानाच्या जनजागृतीसाठी खूप चांगल्या व लक्षवेधी पद्धतीने डॉ.नरेंद्र महाले यांनी जनजागृती केल्याचे शासकीय वर्तुळात बोलले जात आहे.