Monday, November 25, 2024
Homeजळगावमनुदेवी यात्रेसाठी यावल आगारातून एसटी बसेसची सुविधा.

मनुदेवी यात्रेसाठी यावल आगारातून एसटी बसेसची सुविधा.

मनुदेवी यात्रेसाठी यावल आगारातून एसटी बसेसची सुविधा.

यावल दि.४ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी नवरात्रीत मनुदेवी यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने संपूर्ण खानदेशातून भाविक भक्तगण येत असतात त्यासाठी यावल आगारातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापना झाली असून नवरात्रोत्सवास सुरुवात झालेली आहे. सालाबादाप्रमाणे सातपुडा निवासिनी श्री.मनुमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक नवरात्रोत्सव दरम्यान श्री क्षेत्र मनुदेवी येथे येत असतात. त्यानिमित्ताने रा.प.यावल आगारातर्फे दि. ६ ऑक्टोबर २०२४ ते ११ ऑक्टोबर २०२४ या कालावधी दरम्यान मानापुरी पार्किंग स्थळ ते मनुदेवी मंदिर या मार्गावर दररोज सुमारे २० ते २५ जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.सदर कालावधी दरम्यान खाजगी वाहनांना मानापुरीच्या पुढे जाण्यास प्रतिबंध करण्यात येणार असून फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मंदिरापर्यंत जाणार आहेत. भाविकांनी एस.टी.बसचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलेले आहे जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,यंत्र अभियंता किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन,सहा. वाहतूक अधीक्षक जगदिश सोळंके, सहा.कार्यशाळा अधीक्षक तेजस शुक्ल,वाहतूक निरीक्षक कुंदन वानखेडे व सिद्धार्थ सोनवणे परिश्रम घेऊन नियोजन करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या