Thursday, November 21, 2024
Homeजळगावमहामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जामनेरात भव्य रक्तदान...

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जामनेरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून जामनेरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दि.१ सप्टेंबर रविवारी महाराणा उत्सव समिती जामनेर तालुका, केसरीया प्रतिष्ठान जामनेर तालुका, श्री.प्रविणसिंह पाटील व राष्ट्रीय राजपूत करणीसेना खान्देश विभाग टीम, राजपुताना महिला ग्रुप ,जामनेर तालुका व वसुंधरा फाउंडेशन पिंपळगाव गोलाईत यांच्या वतीने रेड प्लस रक्तपेढीकडून द्वारकाधीश हॉस्पिटल जामनेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास तालुका भरातून उदंड प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमासाठी प.पू. श्याम चैतन्यजी महाराज, जामनेरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई गिरीश महाजन, श्री.जितुभाऊ पाटील, श्री . प्रविणसिंह पाटील (जळगाव)चंद्रकांतभाऊ बाविस्कर, शंकर आप्पा पेहलवान ,नवलसिंह भरतसिंह पाटील, विठ्ठलभाऊ मोरे (जळगाव), भगवानसिंह खंडाळकर,(जळगाव),ईश्वरसिंह जाधव (जळगाव) आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले.
यावेळी जामनेर तालुक्यातील ३१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. ३१ जणांच्या या सामाजिक योगदानामुळे अनेकांच्या जीवाचा धोका टाळणार आहे, हीच भावना उपस्थितांच्या मनामध्ये होती. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या शिबिराला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद लाभला .यावेळी प.पू.श्यामचैतन्यजी महाराज यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत अशा प्रकारच्या रक्तदान शिबिरातून गरजू लोकांना वेळोवेळी मदत झाली पाहिजे ही भावना व्यक्त केली. नगराध्यक्षा सौ. साधनाताई गिरीश महाजन यांनी महिलांच्या उपस्थितीबद्दल कौतुक केले,महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी फोनवरून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या शिबिरासाठी. चंद्रकांत भाऊ बाविस्कर, नवलसिंह भरतसिंह पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.डॉ.दिनेशसिंग दिलीपसिंग पाटील (MD. medicine) (द्वारकाधीश हॉस्पिटल)यांनी आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे आय.सी.यू .सेंटर या शिबिरासाठी उपलब्ध करून दिले. हे आय. सी. यू. सेंटर आज पासूनच लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. या शिबिरास दिवसभरातून जामनेर शहरामधील सर्वच डॉक्टरांनी उपस्थिती दिली.

या प्रसंगी डॉ.दिनेशसिंग पाटील यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक प्रविणसिंह पाटील यांचा सत्कारही केला. श्री.विलाससिंह पाटील (मुक्ताईनगर), श्री .व्ही.ए.पाटील सर (पाचोरा) यांनीही या शिबिरासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.या शिबिरासाठी महाराणा उत्सव समिती व केसरीया प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची टीम, वसुंधरा फाउंडेशन पिंपळगाव गोलाईतचे सर्व सदस्य तसेच राजपुताना महिला ग्रुपच्या सर्व माता भगिनी या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले‌. ‌या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. विश्वजीत भुजंगराव सिसोदिया यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे व रक्तदानासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार केसरीया प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डी.एस.पाटील सर यांनी मानले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या